जिल्ह्यात भाजपाची पिछेहाट झाल्याने आत्मचिंतनाची गरज भाजपालाच : माजी मंत्री एकनाथराव खडसे


मुक्ताईनगर : बोदवडमध्ये शिवसेना (shivsena) व भाजपमध्ये (bjp) युती झाल्याने आमचा अंदाज थोडक्यात चुकला मात्र सत्ता भाजपची गेल्याने आत्मचिंतन आम्ही नव्हे तर भाजपने करावे, असे प्रतिटोला माजी मंत्री एकनाथराव खडसे (ncp leader eknathrav khadse) यांनी आमदार गिरीश महाजन (mla girsh mahajan) यांच्या टिकेला जोरदार प्रत्युत्तर देताना लगावला आहे. जामनेरमध्ये माजी मंत्री महाजन यांनी खडसे यांनी रडीचा डाव खेळू नये तसेच राष्ट्रवादी जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे म्हटले होते.

पराभवामुळे महाजन व्यथीत
खडसे म्हणाले की, जळगाव महापालिकेतील सत्तांतर, जिल्हा बँक निवडणुकीतून केलेले पलायन आणि आता बोदवडमधील पराभवामुळे गिरीश महाजन व्यथीत झाले असून आम्ही बोदवडमध्ये झालेला पराभव आधीच मान्य केला असल्याचेही खडसे (ncp leader eknathrav khadse) म्हणाले. बोदवडमध्ये शिवसेना व भाजपाची छुपी युती झाल्याने आमचा पराभव झाल्याचा पुर्नउच्चार खडसे (ncp leader eknathrav khadse) यांनी केला. जिल्हा बँक निवडणुकीत मातब्बर उमेदवार असतानाही पळ काढण्यात आल्याचा प्रकारावर खडसेंनी (ncp leader eknathrav khadse) टिका केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !