आमदार गिरीश महाजनांसह 11 जणांविरोधात गुन्हा


जामनेर : जिल्ह्यात कोविडच्या आपत्तीमुळे जमावबंदी लागू असतांनाही मोर्चा काढून आंदोलन केल्याप्रकरणी माजी मंत्री आमदार गिरीश महाजन (mla girish mahajan) यांच्यासह 11 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला

गुरुवारी काढला होता मोर्चा
शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी भारतीय जनता पक्षाचा गुरुवारी मोर्चा काढण्यात आला होता. कोरोनामुळे जिल्ह्यात जमावबंदी लागू असताना जामनेरात मोर्चा काढल्याप्रकरणी आमदार गिरीश महाजन (mla girish mahajan) यांच्यासह 11 जणांविरुद्ध जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
याप्रकरणी पोलिस स्थानकात दाखल फिर्यादीनुसार आमदार गिरीश महाजन (mla girish mahajan) यांच्यासह उपनगराध्यक्ष प्रा.शरद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, बाबूराव घोंगडे, गोविंद अग्रवाल, तुकाराम निकम, महेंद्र बाविस्कर, नामदेव मंगरूळे, शेख अनीस, शेख नाजीम यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महिनाभरात वीज समस्या न सुटल्यास अधिकार्‍यांना रस्त्यावर फिरू देणार नाही : माजी मंत्री गिरीश महाजन


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !