मोठा दिलासा : ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपालांची स्वाक्षरी


मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न प्रलंबित होता मात्र आता या विधेयकावर राज्यपालांची सही झाल्याने ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परीषदेच्या निवडणुकीत ओबीसींना मोठा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका नकोत असं राज्य सरकारने एक विधेयक मंजूर केलं होतं. त्यावर आता राज्यपालांची सही झाली असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार व मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

आघाडीच्या नेत्यांनी घेतली भेट
महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. याते छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांचाही समावेश होता. राज्यपालांची भेट घेतल्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका न घेण्याच्या विधेयकावर राज्यपालांनी सही केली आहे. त्यामुळे राज्यपालांचे आभार मानण्यासाठी आम्ही राजभवनावर गेलो होतो, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.



आभार मानण्यासाठी राजभवनावर : छगन भुजबळ
जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत राज्यातील निवडणुका घेऊ नयेत आणि 50 टक्क्यांच्या मर्यादेत राहून ओबीसींना राजकीय आरक्षण देण्यात यावं अशा आशयाचं विधेयक महाविकास आघाडीने मंजूर करुन घेतलं होते. हे विधेयक दोन्ही सभागृहात बहुमताने मंजूर करण्यात आलं होतं आणि अंतिम मान्यतेसाठी राज्यपालांकडे पाठवण्यात ओं होतं. देवेंद्र फडणवीस यांच्याशीही यावर चर्चा झाली. राज्यपालांनी आज यावर स्वाक्षरी केली. त्यामुळे त्यांना विनंती न करता आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही राजभवनावर गेलो होतो, असे भुजबळ म्हणाले आहेत.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !