मुख्य अभियंता अभय हरणेंनी बजावला मतदानाचा हक्क
भुसावळ : महानिर्मितीच्या मुंबई मुख्यालयातील कोल विभागाचे मुख्य अभियंता तथा शहरातील रहिवासी अभय हरणे यांनी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. विधानसभा निवडणुकीत मतदानाचा राष्ट्रीय हक्क बजावण्यासाठी त्यांनी मुंबई ते भुसावळ प्रवास केला. मतदानासाठी मिळालेली शासकीय सुटी बरेच मतदार आपल्या कुटूंबासोबत घालवतात मात्र मतदानाचा अधिकार गाजवत नाहीत मात्र हरणेंनी कामाच्या व्यस्ततेतूनही मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भुसावळ गाठले. शहरातील खडकारोडवरील एम. आय. तेली हायस्कूलच्या मतदान केंद्रावर त्यांनी आपल्या मतदान केले. त्यांचा आदर्श शहरवासीयांनी ठेवत आपले राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

