भुसावळ : मतदारयादीत नावे शोधताना मतदारांची तारांबळ


बीएलओंकडून घरपोच चिठ्ठ्या न मिळाल्याची मतदारांची तक्रार

भुसावळ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असलीतरी पावसाच्या रीपरीपमुळे पहिल्या दोन तासात अत्यंत संथगतीने मतदान प्रक्रिया सुरू होती तर दुसरीकडे मतदान केंद्रावर पोहोचल्यानंतरही मतदारांना मतदार यादीत आपले नाव सापडत नसल्याने त्यांचा प्रचंड गोंधळ उडाला. प्रशासनाकडून मतदारांच्या घरापर्यंत चिठ्ठ्या वाटप करण्याचे आदेश असलेतरी अनेक मतदारांनी मात्र घरपोच चिठ्ठी आलीच नसल्याचा आरोप याप्रसंगी केला.

चार तासात 9.9 टक्के मतदान
भुसावळ शहर व तालुक्यात सकाळी सात ते 9 दरम्यान पहिल्या दोन तासात 3.47 टक्के मतदान झाले तर सात ते 11 दरम्यान 9.9 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात 11.9 टक्के पुरूष मतदारांनी तसेच 7.72 टक्के स्त्री मतदारांनी हक्क बजावला.

दीपनगरातही संथ गतीने मतदान
तालुक्यातील दीपनगर येथे पहिल्या चार तासात अत्यंत संथगतीने मतदान सुरू असल्याचे चित्र दिसून आले. अनेक मतदारांनी बीएलओंकडून चिठ्ठी न मिळाल्याचा प्रसंगी आरोप केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !