भुसावळात विद्यमान आमदार संजय सावकारेंनीही कुटुंबासह बजावला हक्क


जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारेंनी केले दीपनगरात मतदान

भुसावळ : भुसावळ विधानसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीचे उमेदवार व विद्यमान आमदार संजय सावकारे यांनी सोमवारी कुटुंबासह आपला मतदानाचा हक्क बजावला तर जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांनी दीपनगर-निंभोरा येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.

आमदारांनी सहकुटुंब बजावला हक्क
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली. सकाळी आमदार संजय सावकारे यांच्यासह त्यांच्या पत्नी रजनी सावकारे, आई सुशीलाबाई सावकारे, मोठ्या भगिनी लताबाई सोनवणे, लहान भगिनी सरला सावकारे, भाचा भावेश ठोसर व कुटुंबातील अन्य सदस्यांनी भुसावळ शहरातील संत गाडगेबाबा विद्यालयात मतदानाचा हक्क बजावला.

चार तासात 9.9 टक्के मतदान
भुसावळ शहर व तालुक्यात सकाळी सात ते 9 दरम्यान पहिल्या दोन तासात 3.47 टक्के मतदान झाले तर सात ते 11 दरम्यान 9.9 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात 11.9 टक्के पुरूष मतदारांनी तसेच 7.72 टक्के स्त्री मतदारांनी हक्क बजावला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !