भुसावळ विधानसभा : दुपारी एक वाजेपर्यंत अवघे 20 टक्के मतदान


भुसावळ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली मात्र पावसाच्या रीपरीपमुळे पहिल्या दोन तासात अवघे 3.47 टक्के मतदान झाले. त्यानंतर पाऊस थांबला असलातरी मतदान केंद्रावर मात्र मतदारांच्या रांगा दिसून आल्या नाहीत. त्यानंतर सात ते 11 वाजेदरम्यान चार तासात 9.9 टक्के मतदान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यात 11.9 टक्के पुरूष मतदारांनी तसेच 7.72 टक्के स्त्री मतदारांनी हक्क बजावला होता. सकाळी साते त दुपारी एक वाजेपर्यंत प्रशासनाकडून आलेल्या आकडेवारीनुसार अवघे 20 टक्के मतदान झाले.

60 हजार 251 मतदारांनी बजावला हक्क
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सात ते दुपारी एक वाजेदरम्यान 34 हजार 968 पुरूष (21.73%) तर 25 हजार 281 महिला (17.25%) व दोन तृतीयपंथीयांनी (09.09%) आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी एक वाजेपर्यंत एकूण 60 हजार 251 मतदारांनी आपला हक्क बजावला.

भुसावळात पहिल्या दोन तासात अवघे 3.47 टक्के मतदान
भुसावळ शहर व तालुक्यात सकाळी सात ते नऊ दरम्यान पहिल्या दोन तासात अवघे 3.47 टक्के मतदान झाले. त्यात 4.55 टक्के पुरूष (7323) मतदार तसेच 2.32 टक्के स्त्री मतदारांनी (3400) हक्क बजावला.

चार तासात 9.9 टक्के मतदान
सोमवारी सकाळी सात ते 11 वाजेदरम्यान 9.9 टक्के मतदान झाले. त्यात 11.9 टक्के पुरूष मतदारांनी तसेच 7.72 टक्के स्त्री मतदारांनी हक्क बजावला. मतदानापासून एकूण शहर व तालुक्यात दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची आशा आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !