भुसावळ विधानसभा : दुपारी तीन वाजेपर्यंत 30 टक्के मतदान
भुसावळ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकांसाठी सोमवारी सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली मात्र पावसाच्या रीपरीपमुळे पहिल्या दोन तासात अवघे 3.47 टक्के मतदान झाले. त्यानंतर पाऊस थांबला असलातरी मतदान केंद्रावर दुपारनंतर मात्र रांगा लागल्याचे चित्र दिसून आले नाही. प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार दुपारी तीन वाजेपर्यंत 29.97 अर्थात 30 टक्के मतदान झाले. दुपारी तीन ते पाच दरम्यान आणखी मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे. सोमवारी दुपारी तीन वाजेदरम्यान 50 हजार 816 पुरूष (31.58%) मतदारांनी तर 43 हजार 147 स्त्री (43.47%) मतदारांनी तसेच दोन तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.
भुसावळात पहिल्या दोन तासात अवघे 3.47 टक्के मतदान
भुसावळ शहर व तालुक्यात सकाळी सात ते नऊ दरम्यान पहिल्या दोन तासात अवघे 3.47 टक्के मतदान झाले. त्यात 4.55 टक्के पुरूष (7323) मतदार तसेच 2.32 टक्के स्त्री मतदारांनी (3400) हक्क बजावला.
पहिल्या चार तासात 9.9 टक्के मतदान
सोमवारी सकाळी सात ते 11 वाजेदरम्यान 9.9 टक्के मतदान झाले. त्यात 11.9 टक्के पुरूष मतदारांनी तसेच 7.72 टक्के स्त्री मतदारांनी हक्क बजावला. मतदानापासून एकूण शहर व तालुक्यात दुपारनंतर मतदानाची टक्केवारी वाढण्याची आशा आहे.
पहिल्या सहा तासात 19.59 टक्के मतदान
प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सकाळी सात ते दुपारी एक वाजेदरम्यान 34 हजार 968 पुरूष (21.73%) तर 25 हजार 281 महिला (17.25%) व दोन तृतीयपंथीयांनी (09.09%) आपला मतदानाचा हक्क बजावला. दुपारी एक वाजेपर्यंत एकूण 60 हजार 251 मतदारांनी आपला हक्क बजावला.
दुपारी तीन वाजेपर्यंत 30 टक्के मतदान
प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार दुपारी तीन वाजेपर्यंत 29.97 अर्थात 30 टक्के मतदान झाले. दुपारी तीन वाजेदरम्यान 50 हजार 816 पुरूष (31.58%) मतदारांनी तर 43 हजार 147 स्त्री (43.47%) मतदारांनी तसेच दोन तृतीयपंथी मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

