किनगावला डीजे वाहनातून बॅटरी लांबवणार्या दोघांना अटक
यावल : तालुक्यातील किनगाव येथे डिजेेच्या वाहनातून बॅटरी चोरी करून विकण्याच्या बेतात असलेल्या दोघांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अजय उर्फ सुरेश अशोक साळुंके व प्रेमा रामसिंग बारेला (दोघे रा. किनगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दोघांविरूध्द यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. किनगाव येथील अजय उर्फ सुरेश अशोक साळुंके व प्रेमा रामसिंग बारेला हे दोघे भुसावळ येथे बॅटरी विकण्यास आल्यानंतर भुसावळ पोलिसांना त्यांच्यावर संशय आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. पोलिस चौकशीत संशयीतांनी बॅटरी चोरीची कबुली दिल्यानंतर त्यांना यावल पोेलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावल पोलिसात मोरेश्वर धनगर यांच्या फिर्यादीवरून त्यांच्या मालकीच्या डीजे वाहनातुन दोघांनी साडेसात हजार रुपये किंमतीच्या बॅटरी चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शना खाली हवालदार सुनील तायडे, विकास सोनवणे, विजय परदेशी करीत आहे.
बॅटरी चोरीचा असाही उलगडा
या दोघांकडे भुसावळ पोलिसांनी बॅटरी कुठून आणली असे विचारल्यानंतर त्यांनी माऊली डीजे, किनगाव यांची बॅटरी असल्याचेे ते म्हणाले. पोलिसांनी याबाबत माऊली डीजे मालकास विचारणा केल्यानंतर त्यांनी आपल्या वाहनात बॅटरी आहे, असे सांगीतले तेव्हा किनगावात संशयीत राहत असलेल्या भागात मोरेश्वर डीजे मालकास वाहनातील बॅटरी तपासण्यासाठी सांगितल्यानंतर त्यावेळी बॅटरी चोरी झाल्याचा उलगडा झाला.

