भुसावळ शहरासह तालुक्यात डेंग्यूचे थैमान


नऊ रुग्ण आढळले : अनेकांवर खाजगी रुग्णालयात उपचार

भुसावळ : शहर व तालुक्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरीकांमध्ये भीती पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला रीपरीप पाऊस, ढगाळ वातावरण आणि यामुळे वाढलेल्या डासांच्या उत्पत्तीमुळे शहरात डेंग्यूच्या रुग्णात वाढ होत असल्याचे बोलले जात आहे. शनिमंदिर वॉर्डातील एका तरुणाचा डेंग्यूमुळे बळी गेल्यानंतर शहरात खळबळ उडाली असून सध्या शहरातील विविध खाजगी हॉस्पीटलमध्ये डेंग्यूच्या नऊ रुग्णांवर उपचर सुरू आहेत तर डेंग्यूसदृश 30 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरूम आहेत. दरम्यानख शनी मंदिर वॉर्डात आरोग्य विभागाने शुक्रवारी 280 घरांमध्ये कंटेनर सर्वेक्षण केले. सात कंटेनरमध्ये एडिस इजिप्ती डासांच्या अळ्या आढळल्याने खळबळ उडाली.

शहरात विविध रुग्णालयात रुग्णांवर उपचार
शनिमंदिर वॉर्डातील रहिवासी सचिन मतपे श्रीवास (वय 31) या तरुणाचा बुधवारी सायंकाळी जळगावमधील ओम क्रिटीकल हॉस्पीटलमध्ये डेंग्यू झाल्याने उपचारादम्यान मृत्यू झाला तर शहरातील विजय बोंडे, गोल्डी पाटील- हंबर्डीकर, अमिनोद्दीन शेख हे रुग्ण ओम क्रिटीकलमध्ये तर शनिमंदिर वार्डातील रहिवासी अंकिता कैलास शर्मा (15) ही जळगाव आर्कीड हॉस्पीटलमध्ये उपचार घेत आहे. दोन दिवसांत शहरात पून्हा डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डॉ.दीपक जावळे यांच्या हॉस्पीटलमध्ये खुशी कैलास परदेशी (10, रा. शनीमंदिर वॉर्ड), श्रृती महेश वायकोळे (14, रा.तळवेल), हर्षदा संजय चौधरी (17, रा.शनिमंदिर वॉर्ड) या तिघांवर रुग्णांवर डेंग्यूचे उपचार सुरू आहेत. धनश्री निवृत्ती नारखेडे (वय 19) रा. तळवेल या तरुणीवर डॉ. राहूल जावळे यांच्याकडे उपचार होत आहेत तर इशांत मनोज राणे (7, रा. बाजारपेठ भाग, भुसावळ) व श्रीनिवास बाळकृष्ण गुरव (8, रा.गोविंद नगर) या दोघांवर डॉ.पंकज राणे यांच्याकडे उपचार सुरू आहेत तसेच डॉ.मानवतकर हॉस्पीटलमध्ये महालक्ष्मी नगर, मिरची ग्राऊंड भागातील गजेंद्र महाजन (26) व त्याचा लहान भाऊ शुभम महाजन (23) तसेच साकेगाव येथील मास्टर कृणाल भोळे (16) या तिघांवर उपचार सुरू आहेत. या सर्व रुग्णांच्या रक्त तपासणीत डेंग्यूची एनएसवन या रक्ततपासणी अहवालात डेंग्यू निष्पन्न झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडे आहे. शहरातील विविध खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यू सदृष्य आजाराचे तब्बल 30 रुग्ण उपचार घेत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !