भुसावळातील अलायन्स मराठी चर्चमध्ये गृहसण साजरा होणार


भुसावळ : अलायन्स मराठी चर्च भुसावळच्या माध्यमातून गृहसणाचे आयोजन करण्यात आले आहे. 31 ऑक्टोंबर ते 3 नोव्हेंबरदरम्यान गृहसणामध्ये विविध वक्त्यांचे व्याख्यान, अध्यात्मिक गीते व प्रमुख वचनांचा अधात्मिक मेळावाही होणार आहे. गृहसणाच्या पहिल्या दिवसापासून ते चार दिवस सांयकाळी 6.30 वाजता आंतरराष्ट्रीय गायक व प्रचारक रेव्ह.विरेंद्र पाटील यांचे व्याख्यान होणार आहे तसेच 3 ऑक्टोंबरला सकाळी 9 वाजता प्रभुवार भक्ती व प्रभू भोजन गृहसण भक्तीचा कार्यक्रम होणार आहे. सांयकाळी पुन्हा व्याख्यानाचा कार्यक्रम होणार आहे.3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी कँडल मार्च काढण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला पाष्टर स्वप्निल नाशिककर यांची उपस्थिती राहणार असून गृहसणाच्या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन अध्यक्ष प्रवीण ओहोळ, सचिव फिलीप फ्रान्सीस तसेच खजिनदार प्रेमचंद जाधव, पंच जया फ्रांन्सिस मणी यांनी केले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !