नागरीकांनी साध्या वेशातील पोलिस बनून शांतता राखा
रावेरचे निरीक्षक रामदास वाकोडे यांचे शांतता समितीच्या बैठकीत आवाहन
रावेर- आगामी येणारे सण हिंदू व मुस्लिम बांधवांनी गुण्या-गोविंद्याने साजरे करा, सोशल मिडियावर दोन समाजात तेढ निर्माण होईल, असे कोणतेही व्हिडिओ, फोटो, ऑडीयो क्लिप व्हायरल करू नका यासाठी सर्व शांतता समिती सदस्यांनीदेखील शांतता कायम अबाधीत ठेवण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा तसेच साध्या वेशातील पोलिस बनवून गावात शांतता ठेवण्याचे काम करा, असे आवाहन रावेर पोलिस स्टेशनचे निरीक्षक रामदास वाकोडे यांनी येथे केले.
रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत नाराजी
रावेरच्या पोलिस ठाण्यात आगामी बकरी ईद, गोकुळसष्टमी, पोळा या सणांच्या पार्श्वभूमीवर रावेर पोलिस स्टेशनतर्फे शांतता समितीची बैठक झाली. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करीत रस्त्यांबद्दल तक्रारी केल्या तसेच रावेरात शांतता ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यांची बैठकीला उपस्थिती
या बैठकीला जिल्हा नियोजन सदस्य पद्माकर महाजन, उपनगराध्यक्ष असदउल्ला खान, नगरसेवक प्रल्हाद महाजन, शेख सादीक, माजी नगराध्यक्ष हरीष गनवाणी, माजी नगरसेवक अॅड.योगेश गजरे, दिलीप कांबळे, अशोक शिंदे, नितीन पाटील, शैलेंद्र अग्रवाल, डी.डी.वाणी, यूसुफ खान, गयास खान, शफी सर, असद मेंबर, सलीम शेख, नसीर खान, श्रीकांत भोकरीकर, अशोक गायकवाड, गयासुद्दीन काझी यांच्यासह हिंदू-मुस्लिम शांतता कमेटीचे सदस्य उपस्थित होते.