दीपनगरात शॉक लागून मजुराचा जागीच मृत्यू
भुसावळ : दीपनगर येथील वीज निर्मिती केंद्रातील मेजर स्टोअरमध्ये काम करताना शिडीला ओव्हरहेड वायरचा स्पर्श होवू सोपान लोटू बोरनारे (40, रा. पिंप्रीसेकम) यांचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास घडली. सोबतचा दुसरा मजूर बचावला. भुसावळ तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. अपघात झाला तेथे 33 केव्हीची तार खाली लोंबकळत असल्याचेे अनेकांनी सांगितले.


