धुमाकूळ घालणारा बिबट्या वनविभागाच्या अखेर पिंजर्‍यात


धरणगाव : चोरगाव शिवारात गेल्या दोन महिन्यापासून धुमाकूळ घालणार्‍या बिबट्या मंगळवारी रात्री वनविभागाने लावलेल्या पिंजर्‍यात अडकला आहे. सोमवार. 14 रोजी चोरगाव येथे मंगल विठ्ठल सोनवणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या वासराचा फडशा बिबट्याने पडला होता. त्यापूर्वी 27 जानेवारीला चोरगाव येथे दोन वासरे बिबट्याने फस्त केली होती. आव्हाणी येथेही गुरांवर हल्ला केला होता.

मंगळवारी बिबट्या अडकला पिंजर्‍यात
मंगळवारी मध्यरात्री हा बिबट्या आव्हाणी येथील नंदू पाटील यांच्या शेतात लावलेल्या पिंजर्‍यात अडकला. बुधवारी सकाळी सहा वाजता आव्हाणी ग्रामस्थांनी ही माहिती वन विभागाच्या अधिकार्‍यांना दिली. नंतर अधिकार्‍यांनी आव्हाणी येथे धाव घेत पिंजर्‍यात अडकलेल्या बिबट्याला ताब्यात घेतले. उपवनसंरक्षक विवेक होशिंग, सहायक वनसंरक्षक एस.के.शिसव यांच्या मार्गदर्शनाखाली एरंडोल वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय लोंढे, मानद वन्यजीव रक्षक विवेक देसाई यांनी पाहणी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !