भुसावळात शहरात उद्यापासून दोन दिवस भव्य बिझनेस मेळावा
शहरातील बियाणी स्कूलच्या मैदानावर आयोजन : खान्देशी पदार्थांची रेलचेल
भुसावळ : रोटरी क्लब ऑफ भुसावळ, श्री माहेश्वरी महिला मंडळ, भुसावळ तसेच इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ ब्लॉझमतर्फे शहरातील प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलच्या मैदानावर शनिवार, 26 व रविवार, 27 रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेदम्यान भव्य बीझनेस मेळावा (आनंदनगरी) चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, लकी ड्रॉदेखील काढण्यात येणार असून विजेत्यांना आकर्षक बक्षीसही दिले जाणार आहे.
हजारो उत्पादनांचे एकाच दालनात प्रदर्शन
या मेळाव्यात गृहोपयोगी प्रसाधनांसह, मसाले, वींटर बियर, विविधांगी साड्या, मुखवास, ज्वेलरी, पापड, युनीक आयटम सादर होणार आहेत शिवाय खवैय्यांसाठी विशेष ग्रामीण भागातील रुचकर पदार्थही मिळणार आहे. त्यात भरीत-पुरी, झुनका-भाकर, कढी फुनके, मिसळ, उडीदाचे वडे, गव्हाची खीर तसेच अन्य लज्जतदार पदार्थ सादर केले जाणार आहेत.
व्यावसायीकांसाठी संपर्काचे आवाहन
मेळाव्यात स्टॉल लावण्यासाठी इच्छुकांनी राजेंद्र फेगडे (9421713833), चित्रा झंवर (8788273692), दीपा झंवर (तृप्ती नागोरी 9518558914), रुचिता अग्रवाल, शीतल भराडीया (9822406232), राजेश अग्रवाल, दिलीप खंडेलवाल, राजेश जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


