रेल्वेतून प्रवास करणार्या चाकरमान्यांना मोठा दिलासा : मेमूतून प्रवासाठी मासिक पास मिळण्यास सुरुवात
भुसावळ : भुसावळ येथून सुरू असलेल्या मेमू गाड्यांमधून अप-डाऊन करणार्या प्रवाशांसाठी शुक्रवारपासून मासिक पास वितरण सेवेला सुरूवात झाली आहे. याबाबतचे आदेश रेल्वेच्या वरिष्ठ विभागाकडून भुसावळ विभागाला देण्यात आल्याने अप-डाऊन प्रवास करणार्या चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
केवळ मेमूतून करता येईल प्रवास
शुक्रवारपासून जंक्शनवरील तिकिट खिडकीवर अप-डाऊन करणार्यांना मासिक पास सुविधा मिळत असून हा पास फक्त मेमू गाडीसाठी वापरता येणार असल्याचे सांगण्यात आले तसेच कोरोनाचे नियम पाळून दोन लस घेतल्याचे प्रमाणपत्र अथवा 72 तास अगोदर लसीकरण केल्याचे प्रमाणपत्र सोबत बाळगावे लागेल. दोन वर्षांनंतर ही सेवा सुरू होत असल्याने चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.


