बक्षीपूरमधील प्रौढाचा उपचारादरम्यान मृत्यू : हाताला विळा लागल्याने सुरू होते उपचार


रावेर : तालुक्यातील बक्षीपूर गावातील 44 वर्षीय इसमाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. झाडाची फांदी तोडतांना विळा हाताला लागल्याने ते गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. या प्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. भगवान लक्ष्मण शिंगोटे (44) असे मयताचे नाव आहे.

उपचार सुरू असताना मृत्यू
भगवान लक्ष्मण शिंगोटे (44, बक्षीपूर) हे घरासमोर असलेल्या झाडावरील फांद्या तोडण्यासाठी झाडावर चढल्यानंतर त्यांच्या हाताला फांदी तोडताना विळा लागला. मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने भगवान शिंगोटे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस हवालदार सतीष सानप करीत आहे.

 




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !