धुळ्यातील तरुणीवर बलात्कार : सोशल मिडीयावरील मैत्री ठरली अडचणीची


धुळे : सोशल मिडीयावरून मैत्री झाल्यानंतर वाढलेल्या जवळीकनंतर तरुणाने गुंगीचे औषध देत तरुणीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून या प्रकरणी तरुणाविरोधात चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. कृष्णा प्रभाकर पाटील (25, रा.अवधान, ता.धुळे) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयीत आरोपीचे नाव आहे.

सोशल मिडीयावरील मैत्री पडली महागात
धुळे शहरातील देवपूर भागातील 21 वर्षीय तरुणीशी आरोपी कृष्णाची सोशल मिडीयावरून ओळख निर्माण झाली व दोघांमध्ये प्रेमही उभरले. तरुणाने तरुणीला लग्न करण्याचे आमिष देत मुंबई-आग्रा महामार्गावरील एका हॉटेलवर नेत तेथे शीतपेयात गुंगीचे औषध टाकून बेशुद्धावस्थेत बलात्कार केला. त्यानंतर अहमदाबाद येथे नेत सुमारे 20 दिवस ठेवत वारंवार अत्याचार केला व 16 फेब्रुवारी रोजी गर्भपाताच्या गोळ्या दिल्याने तरुणीला त्रास होवू लागला मात्र तरुणाने यावेळी जातीवाचक शिवीगाळ करत, धमक्या देत तिला धुळे शहरात आणून सोडले, असा आरोप तरुणीने तक्रारीत केला आहे. संशयीत आरोपी कृष्णा पाटील विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !