धुळ्यात घरगुती सिलिंडरचे वाहनात अवैध रीफिलिंग : दोन लाखांच्या मुद्देमालासह दोघे जाळ्यात


धुळे : घरगुती गॅसचे अवैधरीत्या खाजगी वाहनात अवैधरीत्या रीफिलिंग करणार्‍या प्लँटवर धुळे शहर पोलिसांनी (dhule city police) छापा टाकत 18 सिलिंडरसह ओमन व गॅस भरण्याचे साधने मिळून दोन लाख पाच हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. धुळे शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नितीन देशमुख (dhule city pi nitin deshmukh) यांच्या नेतृत्वात 4 रोजी मध्यरात्री 12.35 वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, इकबाल शेख अब्दुल रऊफ (45, रा.महाले नगर, मोगलाई, कब्रस्थानजवळ, साक्री रोड, धुळे) व रवींद्र सखाराम मोरे (35, पांझरा नदी किनारी, समता नगरजवळ, चौपाटी रोड, धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे शहरातील साक्री रोडवरील पांझरा नदी किनारी बहावल पुरी भवनाच्यामागे मिनी गॅस पंप सुरू असल्याची गुप्त माहिती धुळे शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पथकाने शुक्रवारी मध्यरात्री 12.35 वाजेच्या सुमारास छापा टाकला. यावेळी ओमनी चालक रवींद्र मोरे हे त्यांच्या चारचाकी (एम.एच.18 व्ही.144) मध्ये संशयीत इकबाल शेख अब्दुल रऊफ यांच्याकडून अवैधरीत्या गॅस भरताना आढळून आल्याने दोघांना ताब्यात घेण्यात आले. घटनास्थळावरून 12 भरलेले सिलिंडर, चार अर्धे भरलेले तर दोन रीकामे असलेले सिलिंडरसह इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, सव्वा लाख रुपये किंमतीची चारचाकी मिळून दोन लाख पाच हजार 800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघा संशयीतांविरोधात धुळे शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळ्यातील प्रभारी पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे शहर पोलिस निरीक्षक नितीन देशमुख व शोध पथकातील हवालदार मुख्तार मन्सुरी, विलास भामरे, नाईक रूपेश मनीखेडकर, कुंदन पटाईत, कॉन्स्टेबल शाकिर शेख, निलेश पोतदार, योगेंद्र पाटील, प्रशांत बागूल, अविनाश कराड आदींच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !