मध्यप्रदेशातील वयोवृद्ध रेल्वे प्रवासात बेपत्ता


भुसावळ : गाडी क्रमांक 19483 मधून सुरत-खजुराह प्रवास करीत असलेले मध्यप्रदेशात 68 वर्षीय वयोवृद्ध बेपत्ता झाले असून या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. चिंतामण द्वारकाप्रसाद अवस्थी (68, खरगाव, पन्ना, मध्यप्रदेश) असे बेपत्ता झालेल्या प्रवाशाचे नाव आहे. ही घटना 7 डिसेंबर 2021 रोजी घडली. उंची 5.5 इंच, रंग गोरा, चेहरा लांबट, दात पडलेले, शरीराने सडपातळ असे वर्णन आहे. संबंधित वयोवृद्धाबाबत कुणास काही माहिती असल्यास भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्याचे हवालदार राजू आढाळे (8329497499) यांच्याशी संपर्क साधण्याचे कळवण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !