Nawab Malik मंत्री नवाब मलिकांच्या अडचणी वाढल्या : 14 मार्चपर्यंत न्यायालयीन कोठडी


मुंबई : दाऊद इब्राहिमशी कथित स्वरुपात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी नवाब मलिक (ncp leader nawab malik) यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीनं अटक केली. त्यानंतर त्यांना 13 दिवसांची कोठडी सुनावण्यात आली व ही कोठडी संपल्यानंतर त्यांना मुंबईच्या पीएमएलए कोर्टानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

ऑर्थर रोड तुरुंगात रवानगी होणार
मलिक  (ncp leader nawab malik) यांना अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने त्यांना 13 दिवसांची ईडीची कोठडी सुनावली होती. सोमवारी ही कोठडी संपत असल्यानं त्यांना पुन्हा मुंबईतील विशेष पीएमएलए कोर्टात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. त्यामुळे मलिकांची रवानगी आता ऑर्थर रोड तुरुंगात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.



अटक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह
नवाब मलिकांच्या  (ncp leader nawab malik) वकिलांनी मलिकांच्या अटक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून न्यायालयीन कोठडीला विरोध दर्शवला. मुळातच ईडीची कारवाई बेकायदा असल्याचं सांगत मुंबई हायकोर्टातही ईडीच्या कारवाईला आव्हान देण्यात आले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !