रावेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांवर संकट
रावेर : रावेर तालुक्यात अवकाळी पावसाने शेतकर्यांवर संकट कोसळले आहे. वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे रब्बीचे पीक धोक्यात आले आहे. सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाल्याचा त्यामुळे हरभरा व गव्हाला मोठा फटका बसण्याची भीती आहे.
पंचनाम्यानंतर नुकसान कळणार
रावेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरभरा व गव्हाची लागवड करण्यात आली आहे. सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतकर्यांवर संकट कोसळले आहे. अनेक शेतकर्यांचा हरभरा कापून पडला आहे तर मंगळवकारी आज दिवसभर ढगाळ वातावरण असताना पुन्हा काही भागात पाऊस झाल्याचे वृत्त आहे. पंचनामा झाल्यानंतर प्रशासनाकडून नुकसानीचा आकडा कळणार आहे.
-
भुसावळ स्पोर्ट्स अॅण्ड रनर्स असोसिएशनतर्फे महिलांचा सन्मान
-
मुक्ताईनगरात स्त्री शक्तीचा सन्मान
-
भुसावळात महाआरोग्य शिबिराला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अहिरवाडीत गव्हाला फटका
अहिरवाडी येथे सोमवारी रात्री झालेल्या वादळी वार्यासह पावसामुळे सदाशीव सावळे, रवींद्र वारके, सुनील चौधरी या शेतकर्यांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. नुकसान भरपाईची रक्कम मिळण्याची मागणी उपसभापती धनश्री संदीप सावळे यांनी केली आहे.


