अप-डाऊन हुतात्मा महिनाभर दौंडमार्गे धावणार
भुसावळ : मध्य रेल्वेच्या पुणणे मंडळातील मंकी हिल व कर्जत दरम्यान तांत्रिक कामांसाठी हुतात्मा एक्स्प्रेसच्या मार्गात महिनाभर बदल करण्यात आला आहे. गाडी क्रमांक 11025 अप भुसावळ-पुणे हुतात्मा एक्सप्रेस 1 ते 30 नोव्हेंबरदरम्यान मनमाड, दौंडमार्गे पुण्यापर्यंत धावणार आहे तर परतीच्या प्रवासात गाडी क्रमांक 11026 डाउन पुणे-भुसावळ हुतात्मा एक्सप्रेस 1 ते 30 नोव्हेंबरदरम्यान दौंड, मनमाडमार्गे भुसावळपर्यंत धावणार आहे. रेल्वे प्रशासनाने बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
