फैजपूर पालिकेच्या प्रभारी नगराध्यक्षपदी रशीद तडवी


फैजपूर : नगराध्यक्षा महानंदा रवींद्र होले या 19 नोव्हेंबरपर्यंत रजेवर गेल्याने उपनगराध्यक्ष रशीद नसीर तडवी यांच्याकडे प्रभारी नगराध्यक्ष पदाचा पदभार सोपवण्यात आला आहे. फैजपूर पालिकेच्या नगराध्यक्षा महानंदा होले यांनी 1 ते 19 नोव्हेंबर 2019 पर्यंत रजा टाकल्याचे लेखी पत्र मुख्याधिकारी यांना 31 ऑक्टोबर रोजी दिले आहे. या कालावधीची रजा घेतल्याने रजा कार्यकाळातील त्यांच्या पदाचा पदभार उपनगराध्यक्ष रशीद तडवी यांच्याकडे सोपवावा, असे पत्रात नमूद आहे. दरम्यान, उपनगराध्यक्ष रशीद तडवी यांनी शुक्रवार, 1 नोव्हेंबर रोजी प्रभारी नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !