भुसावळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई मिळण्यासाठी पाठपुरावा करणार


आमदार संजय सावकारे : भुसावळ तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतांची केली पाहणी

भुसावळ : भुसावळ शहर व तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजाचे प्रचंड असे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाकडून प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जावून केले जात असून पंचनाम्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाल्यानंतर शेतकर्‍यांना भरपाई मिळण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना मदतीचा निर्णय देण्यासाठी शासनाकडूनही निर्णय घेतला जात असल्याचेही ते म्हणाले. गुरुवारी भुसावळ तालुक्यातील तळवेल व हतनूर गणात तर शुक्रवारी साकरी व खडका गणातील नुकसान झालेल्या शेतांची आपण प्रत्यक्ष बांधावर जावून पाहणी केल्याचे आमदार संजय सावकारे यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत कृषी विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ व नुकसानग्रस्त शेतकरीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी शेतकर्‍यांच्या व्यथा आमदार संजय सावकारे यांनी जाणून घेतल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !