भोई समाज विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष एस.ए.भोई यांचा गौरव


मुक्ताईनगर : जळगाव जिल्हा भोई समाज विकास मंडळाचे जिल्हाध्यक्ष एस.ए.भोई यांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाबद्दल व कार्याबद्दल त्यांना धुळे येथे नुकत्याच झालेल्या वधू-वर परीचय मेळाव्याप्रसंगी गौरवण्यात आले. महाराष्ट्र समाज भूषण गोकुळ मवारे व धुळयाचे माजी जिल्हाधिकरी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह शाल, श्रीफळ देवून भोई यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी ए.के.भोई, मंडळाचे सरचिटणीस भगवान ओंकार शिवदे यांचाही सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व शाल व श्रीफळ देऊन गौरवण्यात आले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !