बोदवड तालुक्यातील नुकसानीचे तातडीने पंचनामे करा


बोदवड नायब तहसीलदारांना शिष्टमंडळाने दिले निवेदन

बोदवड : परतीच्या पावसाने काढणीस आलेली ज्वारी, कापूस, सोयाबीन, मका, कांदा तसेच भुईमूग पिकांचे नुकसान झाले असून तातडीने पंचनाम्यांना सुरुवात करावी, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने बोदवडच्या नायब तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रब्बीसाठी बियाणे द्यावे
निवेदनाचा आशय असा की, भुईमूग पिकांचे संपुर्ण नुकसान झाले असून महसूल यंत्रणेमार्फत तातडीने पंचनामे करून रपाईचा प्रस्ताव राज्य सरकारकडतरीतत पाठवावा सोबतच सरकारने 2014 पासून वीजबिल मुक्तीबाबत दुर्लक्ष केल्याने वीज बिलात तातडीने सुट द्यावी, आगामी रब्बीसाठी शेतकर्‍यांना बियाणे पुरवावीत, पीक विमा योजनेतील उणीवांमुळे शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने विमा संरक्षित रकमेइतकी भरपाई द्यावी, तालुक्यात विमा कंपनी प्रतिनिधी नसल्याने शेतकर्‍यांना अडचणी येत असून त्यावर तातडीने निर्णय घ्यावा, नुकसानीच्या आकलनासाठी पंचनाम्यांमध्ये वेळ घालवण्यापेक्षा ड्रोन सर्व्हे करावा तसेच शेतकर्‍यांना नुकसान भरपाई आठवडा भरात अदा होण्यासाठी युद्धपातळीवर कामकाज करावेत व आठ दिवसात नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करण्यात टाळाटाळ केल्यास शेतकरी संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

यांच्या निवेदनावर स्वाक्षर्‍या
निवेदनावर जिल्हाध्यक्ष दगडू शेळके, जिल्हा युवा आघाडी प्रमुख ईश्वर लिधुरे, तालुकाध्यक्ष पुरूत्तोत्तम पाटील, शहराध्यक्ष राहुल वाघ, प्रसिद्धी प्रमुख नाना पाटील, सागर कुकडे, विशाल तांगडे, अनंत वाघ, प्रवीण मोरे, तुकाराम माळी, जगन्नाथ शेळके, जीवन राणे, संतोष पाटील, शंकर तेली, रामा तुरे, योगेश शेळके, संजय नेरकर, शांताराम बोरसे, शिवाजी घडेकर, तालुका उपाध्यक्ष संतोष पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !