भोगावती नदी प्रदूषण मुक्त करा अन्यथा भाजपा छेडणार आंदोलन
वरणगाव : भोगावती नदीत येणारे दोन्ही बाजूकडील सांडपाणी त्वरीत बंद करावे अन्यथा भाजपा तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा नगपालिका मुख्याधिकार्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला. निवेदनाचा आशय असा की, वरणगाव शहरातून भोगावती नदी हे वर्षानुवर्षं वाहत असून पावसाळ्यात नदीला मोठ्या प्रमाणात पूर येतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने हल्ली नदीला सांडपाण्याचा नाला केला असून शहरातील सर्व सांडपाणी हे गटारीद्वारे थेट नवीन सांडपाणी प्रकल्पापर्यंत नेणे बंधनकारक असतांना मात्र सर्व सांडपाणी हे भोगावती नदीत सोडल्याने संपूर्ण भोगावती नदी प्रदूषित झाली आहे..
तर तीव्र आंदोलनाचा इशारा
भोगावती नदी मध्ये येणारे सांडपाणी प्रकल्पापर्यंत गटारीद्वारे न्यावे तसेच संपूर्ण भोगावती नदी स्वच्छ करण्यात यावी अन्यथा भारतीय जनता पार्टी भोगावती नदीमध्येच आंदोलन करेल, असा इशारा देण्यात आला. मुख्याधिकारी समीर शेख, प्रशासन अधिकारी पंकज सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले. माजी नगराध्यक्ष सुनील काळे, जिल्हा उपाध्यक्ष अॅड.ए.जी.जंजाळे, मिलिंद भैसे, भाजपा अध्यक्ष सुनील माळी, सरचिटणीस गोलु राणे, भाजयुमो शहराध्यक्ष आकाश निमकर, शामराव धनगर, महिला आघाडी शहराध्यक्ष प्रणिता पाटील, गजानन वंजारी, मयूर गावंडे, कृष्णा माळी, डॉ.सादिक शेख, मुस्लिम अन्सारी, रमेश पालवे, कमलाकर मराठे, हाजी अल्लाउद्दीन सेठ, संगीता माळी, मंदा थटार यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.


