भुसावळ पालिकेनंतर आता पंचायत समितीवर प्रशासक राज
भुसावळ : पंचायत समितीचा पंचवार्षिक कार्यकाळ संपुष्टात आला आहे. यामुळे सोमवारपासून प्रशासकीय राजवट सुरू झाली आहे. गटविकास अधिकारी विलास भटकर यांच्याकडे ही जबाबदारी असून पुढील निवडणूक होईपर्यंत ही प्रशासकीय राजवट कायम असणार आहे.
13 मार्च रोजी कालावधी संपुष्टात
पंचायत समितीचा कालावधी 13 मार्च रोजी संपुष्टात आला. तत्पूर्वी, मुदत संपण्यापूर्वी पंचवार्षिक निवडणूक झाली नाही. आगामी काळात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर ही निवडणूक लांबण्याची शक्यता आहे. यामुळे सोमवारपासून प्रशासकांकडे कारभार गेला आहे. यापूर्वी नगरपालिकेचा कार्यकाळ डिसेंबरमध्ये संपूनही कोरोनामुळे निवडणूक झाली नव्हती. त्यामुळे तेथे प्रांताधिकार्यांना प्रशासक म्हणून नेमण्यात आले. आता पंचायत समितीत प्रशासक राज आले आहे.


