फैजपूरात यळकोट यळकोटच्या गजरात खंडोबा यात्रोत्सवाला प्रारंभ


फैजपूर : खान्देशवासीयांचे आराध्यदैवत असलेल्या खंडोबारायाच्या यात्रेस गुरुवाी सकाळी सात वाजता विधीवत पूजा, आरती करून सुरुवात करण्यात आली.

पंजाबमध्ये आता भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांची हप्ता वसुली बंद

यांची होती उपस्थिती
सकाळी देवस्थानचे गादिपती महामंडलेश्वर पुरूषोत्तमदासजी महाराज, पुजारी राममनोहर दासजी, पवन महाराज, फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी कैलास कडलग, डॉ.गणेश भारंबे, डॉ.उमेश चौधरी, केयुर टेन्टचे अमोल चौधरी, सामाजिक कार्यकर्ते नितीन नेमाडे, रामा होले, नरेंद्र चौधरी, सुधाकर नेहते, केतन गुजराथी, नरेंद्र चौधरी, दोधू बोरोले भुसावळ, चरीत लोखंडे भुसावळ, पत्रकार प्रा.उमाकांत पाटील, नंदू अग्रवाल, अरुण होले, निलेश पाटील, कमलाकर भंगाळे, फोटोग्राफर मनोज होले, लाला भिरूड, रोशन होले, गोटू भारंबे यांच्या हस्ते देवस्थानातील जागृत अश्वारूढ खंडोबाराया, म्हाळसाई व बाणाई माता यांच्या मूर्तीला पंचामृताने अभ्यंग स्नान घालून नवीन वस्त्र परीधान करण्यात आले.

येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर
सुंदर फुलांच्या माळा अर्पण करून सर्वांनी आरती गायली. तत्पूर्वी ब्राह्मण पुरोहितांनी वरील भक्तगणांच्या हस्ते विधीवत श्री गणपती पूजा केली. देवस्थानचे गादिपती महामंडलेश्वर पुरूषोत्तमदासजी महाराज, पुजारी राममनोहर दासजी, पवन महाराज यांनी येळकोट येळकोट जय मल्हार… मल्हारी मार्तंड जय मल्हारचा जय घोष करून भंडारा उधळून यात्रोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मंदिरामध्ये उपस्थित सर्व भाविकांनी खंडोबा रायाचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. अपेक्षित गर्दी टाळण्यासाठी आज पासून पुढील आठ दिवस ही यात्रा भरणार असून कोरोना नियमाचे पालन करून यात्रेचा आनंद सर्व भाविक भक्तांनी घ्यावा असे आवाहन खंडोबा देवस्थान व प्रशासनाने तर्फे करण्यात आले आहे. दरम्यान, यात्रेत येताना महिलांनी मौल्यवान दागदागिने आणू नये, मोबाईल, पॉकेट मार व्यक्तींपासून सावध रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !