फैजपूर येथील स्वातंत्र्य सैनिक चिमण होले यांचे निधन
फैजपूर : शहरातील होले वाड्यातील रहिवासी व स्वातंत्र्य सैनिक चिमण आसाराम होले (93) यांचे शनिवार, 2 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांचा पश्चात तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परीवार आहे. ते नारायण, लिलाधर, विनोद होले यांचे वडील तर भाजपा कार्यकर्ते रामा होले यांचे आजोबा होत. त्यांनी 1936 साली फैजपूर येथील ग्रामीण काँग्रेस अधिवेशनात त्यांचा मोठा सहभाग होता. त्याच प्रमाणे 1947 मध्ये चले जाव स्वतंत्र लढ्यात त्यांना धुळे येथे तुरंगवास भोगावा लागला होता. त्यांच्या पार्थिवावर महसूल विभागातर्फे प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, यावल तहसीलदार जितेंद्र कुवर, फैजपूर मंडळ अधिकारी जे.डी.बंगाले, तलाठी प्रशांत जावळे, फैजपूर पोलीस स्टेशन तर्फे सहायक फौजदार विजय पाचपोळे, हेड कॉन्स्टेबल हेमंत सांगळे, चेतन महाजन, यशवंत टहाकळे, निलेश काकडे यांनी पुष्पचक्र वाहून श्रद्धांजली अर्पण केली.

