चोर्‍यांना पायबंद लावण्यासाठी पोलिसांचे कोम्बिंग : संशयीत गवसला


Sawada Police Kombing सावदा : गेल्या काही दिवसांपासून चिनावल परीसरात भुरटे चोर, टवाळखोरांनी उपद्रव माजवून शेतकर्‍यांच्या नुकसानीचे सत्र कायम ठेवले आहे. या प्रकारांवर पायबंद घालण्यासाठी सावदा पोलिसांनी 16 मार्चच्या मध्यरात्री चिनावल, वाघोदा, वडगाव, कोचूर, रोझोदा, सावखेडा, कळमोदा गावांचा परिसर व शेत शिवारात कोम्बिंग ऑपरेशन राबवले. त्यात वडगाव येथील यासिन तडवी या संशयिताला मध्यरात्री ताब्यात घेण्यात आले.

मुक्ताईनगरात भरदिवसा चोरट्यांचा 60 हजारांच्या ऐवजावर डल्ला

पोलिसांच्या कारवाईने उडाली खळबळ
कारवाईदरम्यान पोलिसांनी संशयीत असणार्‍या प्रत्येकाची झाडाझडती घेतली. सावद्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देविदास इंगोले, निंभोर्‍याचे एपीआय गणेश धुमाळ, उपनिरीक्षक राजेंद्र पवार, समाधान गायकवाड, मेहमूद शहा, उमेश पाटील, विनोद पाटील, पांडुरंग सपकाळे यांनी ही कारवाई केली. त्यात 8 पकड वॉरंट व 12 समन्स बजावण्यात आले. मुंबई कट 122 प्रमाणे सूर्यास्तापासून ते सूर्योदयापर्यंत संशयीतरीत्या फिरणार्‍या वडगाव येथील संशयित यासिन तडवी याला मोठा वाघोदा येथे मध्यरात्री अटक केली. नाकाबंदी करून 11 वाहन चालकांकडून 3500 रुपये दंड, तर 35 वाहने, एक लॉज, चार हॉटेल, चार हिस्ट्रिसीटर संशयितांची तपासणी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !