रावेर रंगपंचमी व्याख्यानमाला अध्यक्षपदी विठोबा पाटील


रावेर : शहरातील रंगपंचमी व्याख्यान मालेच्या अध्यक्षपदी विठोबा पाटील तर सचिवपदी अनिल महाजन यांची नुकतीच बिनविरोध निवड करण्यात आली. व्याख्यानमालेचे विश्वस्त दिलीप वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत ही निवड झाली. विश्वस्त डॉ.राजेंद्र आठवले यांनी येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या व्याख्यानमालेसाठी संभाव्य वक्ते, त्यांचे विषय याबाबत मार्गदर्शन केले. दिवाळीची सुट्टी संपल्यानंतरच्या पंधरवड्यात व्याख्यान मालेचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मावळते अध्यक्ष सचिन जाधव, हेमेंद्र नगरीया, प्रतीक महाजन, कैलास वानखेडे यांनीही सूचना मांडल्या.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !