साळशिंगीच्या तत्कालीन प्रशासकासह ग्रामसेवकावर कारवाईसाठी उपोषण
बोदवड : तालुक्यातील साळसिंगी येथील रहिवासी विलास कडू सुशीर यांनी 23 सप्टेंबर रोजी साळसिंगी ग्रामपंचायतीचे तत्कालीन प्रशासक दिगंबर भास्कर सपकर व ग्रामसेवक वराडे यांच्याकडून नमूना नंबर आठ, घर नंबर 327 च्या वारसाच्या नोंदिचा उतारा उतारा मागितला होता मात्र तत्कालीन प्रशासक दिगंबर भास्कर सपकार व ग्रामसेवक वराडे यांनी वारसाच्या नोंदीचा उतारा देण्यास अडवणूक करीत आधी रोख रक्कम द्या व नंतर उतार घ्या, अशी भूमिका मांडल्याने व उतारा देण्यास संबंधीत अधिकार्यांनी टाळाटाळ केल्याने त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण छेडले आहे. मागणी संदर्भात गटविकास अधिकारी तसेच बोडवड पोलीस निरीक्षक, प्रशासक व ग्रामसेवक ग्रामपंचायत साळसिंगी यांना निवेदन देण्यात आले आहे.

