डेंग्यूबाबत पालिकेने कराव्यात उपाययोजना


मुस्लीम नुमाइन्दा कौन्सीलचे मुख्याधिकारी प्रशासनाला निवेदन

भुसावळ : शहरात दिवसागणिक डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने नागरीकांमध्ये घबराट पसरली आहे मात्र दुसरीकडे डेंग्यू आटोक्यात येण्यासाठी पालिका प्रशासनाकडून कुठल्याही उपाययोजना होत नसल्याने नागरीकांमध्ये पालिका प्रशासनाविषयी चीड निर्माण झाली आहे. स्थानिक पालिकेच्या रुग्णालयात डेंग्यू आजारावर उपचारासाठी पुरेशी सुविधा नसल्याने गोरगरीब रुग्णांना खाजगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहे. पालिका प्रशासनाने डेंग्यू आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी तातडीने प्रयत्न करावेत, अशी मागणी मुस्लीम नुमाइन्दा कौन्सीलतर्फे मुख्याधिकारी प्रशासनाकडे मंगळवारी लेखी निवेदनाद्वारे करण्यात आली.

पालिकेकडे धुरळणी यंत्रच नाही
शहरात डेंग्यूचा फैलाव वाढत असताना डेंग्यूबाबत प्रभावी उपाययोजना करण्यात पालिका असफल ठरली आहे. शहरातील सत्ताधारी भाजपाचे नगरसेवक पिंटू कोठारी यांनी प्रभागातील नागरीकांसाठी स्वखर्चाने धुरळणी यंत्र घेवून प्रत्यक्षात प्रभागात धुरळणीदेखील केली शिवाय या यंत्राद्वारे नजीकच्या प्रभागातही धुरळणी सुरू आहे मात्र नाशिक विभागात ‘अ’ वर्ग असलेल्या पालिककडे धुरळणी यंत्राचा पत्ताच नसल्याची ओरड नागरीक करीत आहेत.




यांची होती उपस्थिती
पालिका प्रशासनाला निवेदन देताना मुस्लीम नुमाइन्दा कौन्सीलचे अध्यक्ष मो.नुरमोहम्मद, सचिव मो.हनीफ, मिडीया सल्लागार सलाउद्दीन अदीब, स.अल्लाबक्ष, अ‍ॅड.एहतेश्याम व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !