राजश्री नेवे यांचा राज्यस्तरीय स्नेहबंध प्रेरणाज्योती पुरस्काराने गौरव
भुसावळ : सामाजिक कार्यकर्त्या व खी श्रावणी बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा राजश्री उमेश नेवे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेवून स्व.हरीश्चंद्र फौंडेशन, बहुउद्देशीय समाजसेवी संस्था व स्नेहबंध वाचनालय भोसे (पंढरपूर) यांच्यावतीने राज्यस्तरीय स्नेहबंध प्रेरणाज्योती पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात आले. सोलापूर शहरातील डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा पुरस्कार नेवे यांना प्रदान करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
या सोहळ्यास महाराष्ट्र राज्य कलाध्यापक महामंडळाचे पुणे विभागीय उपाध्यक्ष विठ्ठल मोरे, प्राचार्य दिनकर पवार, मराठी साहित्य परीषदेचे अध्यक्ष पद्माकर कुळकर्णी, साहित्यिक सीमा राऊत पाटील, सोमसिंग चव्हा, पंढरपूर वकिल संघाचे अध्यक्ष अॅड.भगवानराव मुळे, अभिनेत्री शैला शिंदे, सहाय्यक कुलसचिव प्रा.दीपक अडगळे, निवेदिका उन्नती जगदाळे, जिल्हा बाल संरक्षण कक्षाधिकारी विनोदचंद्र बंदगी, सैय्यद तसनीम कौसर आदींची उपस्थिती होती.



