दीपनगरात मराठी रंगभूमी दिन उत्साहात
दीपनगर : लेखक, दिग्दर्शक , हौशी नाट्य कलावंत आणि रंगभूमीसाठी झिजणार्या सर्वच तंत्रज्ञांनी एकत्र येऊन मंगळवारी सायंकाळी सात वाजता मराठी रंगभूमी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता पंकज सपाटे व विवेक रोकडे होते. यावेळी मुख्य अभियंता विवेक रोकडे, उपमुख्य अभियंता नितीन पुणेकर, कार्यकारी अभियंता संजय पखान, चंद्रकांत सपकाळे, राजेश पवार, नितीन देवरे, अतुल बर्हाटे, राकेश सातोटे, रोशन वाघ, संजय लोकरे, सोपान चौधरी, अश्विन शेखरवार, आप्पा राठोड, योगराज चौधरी, श्रध्दा कदम, ऐश्वर्या खोसे, शामल जाधव व बालकलाकार विभुती बरहाटे यांनी नटराज पुजन केले. विवेक रोकडे यांनी उपस्थित कलावंतांना मार्गदर्शन केले. सूत्रसंचालन चंद्रकांत सपकाळे तर आभार प्रदर्शन राजेश पवार यांनी मानले.

