चाकूच्या धाकावर विवाहितेवर अत्याचार : आरोपी जाळ्यात
भुसावळ : चाकूच्या धाकावर 20 वर्षीय तरुण विवाहितेचे अपहरण अत्याचार केल्याप्रकरणी पहुर पोलिसात संशयीत आरोपी गौरव राजु कुमावत (26, रा.पहुर पॉवर हाउस, सब स्टेशन ता.जामनेर) व भिक्या तडवीविरुद्ध गुन्हा दाखल होता. 11 ऑक्टोबर 2019 रोजी या प्रकरणी पहुर पोलिसात गुन्हा दाखल होता मात्र आरोपी गुन्ह्यानंतर पसार झाला होता. संशयीत आरोपीचा शोध सुरू असतानाच बुधवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास संशयीत आरोपी बसस्थानक भागात असल्याची माहिती भुसावळ बाजारपेठ पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी त्यास अटक करण्यात आली. पहूर पोलिसांना याबाबत माहिती कळवण्यात आली.
यांच्या पथकाने केली कारवाई
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, उपविभागीय पोलीस अधिकारी गजाजन राठोड सो, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत, प्रभारी पोलिस निरीक्षकबाबासाहेब ठोंबे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुनील जोशी, शंकर पाटील, संजय भदाने, रवींद्र बिर्हाडे. रमण सुरळकर, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव आदींच्या पथकाने केली.

