साकळीत जुगारावर छापा : सात जुगारी जाळ्यात
यावल : तालुक्यातील साकळी येथे जुगार अड्ड्यावर छापा टाकून सात जुगारींना अटक करण्यात आली. बुधवारी दुपारी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस कर्मचारी रमेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सैय्यद अली, अफजल तडवी, मोनल बडगुजर, कमल पाटील, रफी पिंजारी, जगन निळे व जहांगीर कुरेशी यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून चार हजार 680 रुपये रोख व पत्ता जुगाराची साधने जप्त करण्यात आली. ग्रामपंचायतच्या मागे सुरू असलेल्या जुगारावर जळगाव स्थानिक गुन्हा शाखेचे हवालदार अनिल इंगळे, सुरेश महाजन, मिलींद सोनवणे, रमेश चौधरी, संतोष मायकल, दर्शन ढाकणे आदींनी बुधवारी दुपारी छापा टाकला.

