रेल्वे कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर पाल्यास मिळाली नोकरी


भुसावळ : मध्य रेल्वेचे कर्मचारी लिलाधर रामसिंग चौधरी यांचे 1 नोव्हेंबर रोजी कर्तव्यावर असताना रेल्वेखाली आल्याने निधन झाल्यानंतर रेल्वे प्रशासनातर्फे कुटुंबाला तातडीची मदत दिली तसेच दोनच दिवसात त्यांना सेटलमेंट ड्यूज आणि पेन्शन पे ऑर्डर देण्यात येऊन त्यांचा मुलगा रंजीत चौधरी यास अनुकंपा आधारावर रेल्वेत एमओएचशेडमध्ये टेक्नीशीयन- 3 या पदावर नोकरी देण्यात आली. भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांच्याहस्ते नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. याकामी वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी.गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस.वडनेरे, मुख्य कर्मचारी कल्याण निरीक्षक आर.पी.झनके व इतर कल्याण निरीक्षकांसह रेल्वे अधिकारी व कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !