लग्नाच्या आमिषाने अत्याचार : शेवगावच्या तरुणास अटक
जळगाव : चोपडा तालुक्यातील मूळ रहिवासी असलेल्या व शहरातील एका महाविद्यालयात एमसीएमचे शिक्षण घेण्यासाठी आलेल्या 25 वर्षीय तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार केल्याप्रकरणी सचिन रावसाहेब इंगळे (27, रा.शेवगाव जि.अहमदनगर) याला एमआयडीसी पोलिसांनी शेवगाव येथून अटक केली. 2014 मध्ये या तरुणीने विवाह नोंदणी वेबसाईटवर ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर आरोपी सचिन इंगळेशी ओळख झाल्यानंतर त्याने सलगी वाढवत 2015 मध्ये जळगावात येवून शहरातील एका लॉजवर नेत तरुणीला लग्नाची मागणी घालत अत्याचार केला. त्यानंतर 2019 या वर्षात आरोपी सचिन ने अयोध्या नगरात भाड्याने खोली घेतली. दोन महिन्याच्या काळातही त्याने वेळोवेळी शारीरीक संबंध प्रस्थापित केले.त्यातून पीडित गर्भवती राहिली. पुन्हा एकदा सोनोग्राफी केली असता त्यातही निष्पन्न झाले. पीडितेने गर्भपातास नकार दिला असता सचिन याने खोटे मंगळसूत्र घालून एका रुग्णालयात गर्भपाताच्या गोळ्या खायला दिल्याने पीडिता बेशुध्द झाली. या प्रकारानंतर त्याने थेट लग्नालाच नकार दिला व शेवगाव येथे निघून गेला. त्यानुसार बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. संशयिताच्या अटकेसाठी पोलीस निरीक्षक रणजीत शिरसाठ यांनी सहायक फौजदार रामकृष्ण पाटील, हेमंत कळसकर व पंकज सापकर यांचे पथक नेमले होते. या पथकाने बुधवारी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
