एस.टी.कर्मचार्‍यांचे वकील अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते यांना अटक


Gunratna Sadavarte मुंबई : एस.टी.कर्मचार्‍यांचे वकील अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना अटक करण्यात आली असून सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा त्यांच्यावर नोंदवण्यात आला आहे. गावदेवी पोलीस स्टेशनमध्ये अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा
शुक्रवारी झालेल्या आंदोलनात एक पोलीस अधिकारी जखमी झाल्याने . अ‍ॅड.गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांच्यावर त्यामुळे आयपीसी कलम 353 (सरकारी कामात अडथळा, 120 इ समान हेतू) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.



आपल्या जीवाला धोका ः अ‍ॅड.सदावर्ते
कोणतीही नोटीस न देता मला ताब्यात घेतलं आहे, व्यक्तीस्वातंत्र्यावर गदा आहे अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिली आहे. मला ताब्यात घेताना कोणत्याही प्रक्रियेचे पालन करण्यात आलं नाही. माझ्या जीवाला काही धोका निर्माण झाला तर त्याला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील जबाबदार असतील असंही ते म्हणाले.

धक्कादायक ! : एस.टी.कर्मचारी आक्रमक : शरद पवारांच्या बंगल्यात चपला फेकल्या, दगड भिरकावले

आधी घेतले ताब्यात नंतर केली अटक
अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेण्यासाठी गावदेवी पोलीस स्टेशनमधील कर्मचारी त्यांच्या घरी गेले. एसीपी पांडूरंग शिंदे यांनी बिल्डिंगखालून त्यांना कॉल केला असता सदावर्तेंनी त्यांना वरती बोलावले. त्यानंतर चौकशीसाठी पोलिसांनी अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते (Gunratna Sadavarte) यांना ताब्यात घेतलं.

हल्ला दुर्दैवी मात्र आताही एस.टी. कर्मचार्‍यांशी बोलायला तयार : सुप्रिया सुळे


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !