लोहमार्ग पोलिसांची कामगिरी : चोरट्यांकडून जप्त मोबाईल मूळ मालकाला केले परत


भुसावळ : प्रवाशांचे मोबाईल लांबवणार्‍या चोरट्यांच्या मुसक्या लोहमार्ग पोलिसांनी आवळल्यानंतर दोघा प्रवाशांना त्यांचे मोबाईल लोहमार्गचे पोलिस निरीक्षक दिनकर डंबाळे यांनी परत केले. भुसावळातील सय्यद अशपाक अली हुकुमत अली हे सुरत ते भुसावळ पोरबंदर हावडा एक्स्प्रेसने 25 जुलै 19 रोजी प्रवास करीत असतांना ते जळगाव रेल्वे स्थानकावर उतरल्यावर त्यांचा 25 हजार 990 रुपये किंमतीचा मोबाईल चोरट्यांनी लांबवला होता तर या प्रकरणी गोपाळ चौधरीची चौकशी करून पोलिस खाक्या दाखवताच चौधरी याने चोरलेला मोबाईल काढून दिला. दुसर्‍या घटनेत ललित राजेश सोनटक्के (रा.बोदवड) हे 2 एप्रिल रोजी हावडा मेलने भुसावळ ते मुंबई असा जनरल डब्यातून प्रवास करीत असताना त्यांचाही मोबाईल लांबवण्यात आला. या प्रकरणी समीर शहा कलीम शहा (रा. भुसावळ) यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडून सोनटक्के यांचा 12 हजार रूपये कींमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. बुधवारी रात्री सोनटक्के व सै.अशपालक अली यांनाही निरीक्षक डंबाळे यांनी मोबाईल परत केला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !