मुक्ताईनगर बस आगाराच्या जागेवर होणार व्यापारी संकुल


नूतन आमदार चंद्रकांत पाटीला यांनी केली जागेची : शहराचा विकास होण्याची आशा

मुक्ताईनगर : शहराला सुसज्य असे व्यापारी संकुल नसल्याने या शहराची टपर्‍यांचे शहर अशी ओळख निर्माण झालेली आहे. नूतन आमदार चंद्रकांत पाटील यांनी वेळोवेळी आंदोलने करून शहरात व्यापारी संकुल उभारण्यात यावे, अशी मागणी केली होती मात्र दखल घेण्यात आली नाही. शहरातील छोट्या-मोठ्या व्यापार्‍यांच्या समस्यांची जान असल्याने व त्या व्यावसायीकांच्या व्यवसायाला चालना मिळावी यासाठी प्रयत्नशील असलेल्या नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी सकाळी आठ वाजता मुक्ताईनगर बस आगाराला भेट दिली व जागेची पाहणी केली.

परीवहन महामंडळ अध्यक्षांशी केली चर्चा
तत्पूर्वी त्यांनी तीन दिवसांआधी राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष तथा मंत्री दिवाकर रावते व तत्सम अधिकार्‍याशी चर्चा केली आहे व तीन दिवसांपूर्वीच सदर बस आगाराच्या जागेचा उतारा, नोंदी व नकाशे स्थानिक शासनाकडून उपलब्ध केले त्यामुळे आता लवकरच शहरात सुसज्य असे व्यापारी संकुल उभे राहील व शहराच्या विकासात खर्‍या अर्थाने चालना मिळेल, असा आशावाद व्यक्त होत आहे.

विकासकामे करणार -आमदार चंद्रकांत पाटील
जनतेने मला मतदारसंघाचा विकास करण्यासाठी निवडून दिले असल्याने प्राधान्याने विकासकामांवर लक्ष देणार आहे. सर्वात आधी हा व्यापारी संकुलाचा प्रश्न, बोदवड तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न, शेतीसाठी सिंचनाचा प्रश्न मार्गी लावण्यावर आपला भर असेल व त्यानंतर इतर विकासकामे मतदारांच्या अपेक्षेनुसार करण्याचा प्रयत्न असेल, असे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !