हुतात्मा एक्स्प्रेसला आता एलएचबी कोच
भुसावळ : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातून धावणार्या भुसावळ-पुणे हुतात्मा एक्स्प्रेस व पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस या गाडीला 10 नोव्हेंबरपासून एलएचबी कोच लावले जाणार आहेत. नवीन एलएचबी कोच लावून ही गाडी रविवारपासून धावणार आहे. एलएचबी कोच लावल्यावर या गाडीला 19 डबे जोडले जातील. यात 14 डबे द्वितीय श्रेणी चेअर कार, असतील. नवीन डब्यांमध्ये बायो टॉयलेट बसवण्यात आले आहेत.
