मुख्य कर्मचारी कल्याण निरीक्षक आर.पी.झनके यांना सन्मान
भुसावळ : साकरी फाटा भागातील रेल्वे कर्मचारी लिलाधर रामसिंग चौधरी या रेल्वे कर्मचार्याचे सेवेत असताना 1 नोव्हेंबर रोजी रेल्वे खाली आल्याने अपघाती निधन झाले होते. त्यांच्या परीवारास रेल्वे प्रशासनातर्फे तातडीची मदत देण्यात आली तसेच दोनच दिवसात त्यांना सेटलमेंट ड्यूज आणि पेन्शन पे ऑर्डर देण्यात येऊन त्यांच्या मुलास (रंजित) यास अनूकंपा आधारावर रेल्वेत एमओएच विभागात टेक्नीशियन- 3 या पदावर मंडळ रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांच्या हस्ते नोकरीचे नियुक्तीपत्र देण्यात आले. या कामी वरीष्ठ मंडळ कार्मिक अधिकारी एन.डी. गांगुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कार्मिक अधिकारी व्ही.एस.वडनेरे, आर.एच.परदेशी व मुख्य कर्मचारी कल्याण निरीक्षक आर.पी.झनके व इतर कल्याण निरीक्षकांसह रेल्वेचे अधिकारी व कर्मचार्यांनी परीश्रम घेतल्याने मुख्य कर्मचारी कल्याण निरीक्षक आर.पी.झनके यांनी उत्कृष्ट कार्य केल्याने त्यांना मंडळ रेल प्रबंधक विवेककुमार गुप्ता व एडीआरएम मनोज कुमार सिन्हा यांनी प्रमाणपत्र व एक हजारांचे रोख बक्षीस देऊन गौरवले.

