रावेरमधील ओंकार इंडस्ट्रीजच्या मालकाला प्रांतांची नोटीस
26 रोजी प्रत्यक्ष हजर राहून खुलासा सादर करण्याचे आदेश
रावेर : ओंकार इंडस्ट्रीज या कंपनीचे केमिकल मिक्स पाणी नदीत सोडल्याने भुगर्भातील पाणी दूषित केल्याप्रकरणी संबंधित कंपनीला प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी सशर्त नोटीस पाठवून 26 रोजी हजर राहण्याचे बजावले आहे. ओंकार इंडस्ट्रीज या कंपनीने केमिकल मिक्स दूषित सांडपाणी नाल्यात सोडल्याने चार गावांच्या पाणीपुरवठ्याच्या कुपनलिकांसह परीसरातील सुमारे 35 ते 40 कुपनलिकांचे पाणी दूषित झाल्याची तक्रार निंबोल, अजंदा, विटवा व नांदूरखेडा येथील ग्रामपंचायतीसह शेतकर्यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळाकडे केली होती. दरम्यान, याबाबत आमदार शिरीष चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी अजंदा येथे बैठक झाली व इंडस्ट्रीज येथून तत्काळ बंद करावी यासाठी शेतकर्यांनी 20 दिवसांचा अल्टीमेटम दिला होता. त्यानंतर अखेर प्रशासन खळबडून जागे झाले व कारवाईला सुरुवात झाली.
मालकाने 26 नोव्हेंबरपर्यंत म्हणणे मांडावे -प्रांताधिकारी
ओंकार इंडस्ट्रीजच्या विषारी दूषित पाण्यामुळे होणारे दुष्पपरीणाम मानवी जीवनास व शेती पिकास हानीकारक होत असल्याने सार्वजनिक उपद्रव दुू करावा त्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात तसेच 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता सुनावणीसाठी योग्य त्या साक्षी पुराव्यासह समक्ष उपविभागीय दंडाधिकारीकडे आपली बाजु मांडण्यासाठी उपस्थित रहावे अन्यथा फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम (1) ड प्रमाणे कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा नोटीसीद्वारे प्रांतधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी दिला आहे.

