रावेर कृउबा सभापतीपदासाठी 18 रोजी निवडणूक


रावेर : रावेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापती पदाची निवड येत्या सोमवार, 18 नोव्हेंबर रोजी होणार आहे. ठरल्याप्रमाणे डी.सी.पाटील यांनी सभापतीपदाचा तर कैलास सरोदे यांनी उपसभापती पदाचा राजीनामा दिला. रीक्त झालेल्या पदावर येत्या 18 नोहेंबर रोजी निवडणूक होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक निबंधक एस.एफ.गायकवाड हे या निवडणुकीचे कामकाज पाहणार आहेत. त्यांना सचिव गोपाळ महाजन यांचे सहकार्य लाभत आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !