p>

चारचाकीतून साडेतेरा लाखांची रोकड लंपास : उत्तरप्रदेशातील दोघे जाळ्यात


औरंगाबादसह बंग्लोरमध्ये आरोपींविरुद्ध चोरीचे अनेक गुन्हे

भुसावळ- चारचाकीच्या काचा फोडून त्यातून अलगदपणे रोकड असलेली बॅग लांबवणार्‍या उत्तप्रदेशातील दोघा अट्टल चोरट्यांच्या बाजारपेठ पोलिसांच्या मुसक्या आवळल्या आहेत. यावलच्या तक्रारदाराची 12 जुन 2019 रोजी भुसावळातील अयान कॉलनीतून चोरट्यांनी 13 लाख 50 हजारांची रोकड लांबवण्याच्या गुन्ह्यात आरोपींना न्यायालयाच्या आदेशाने औरंगामधून ताब्यात घेण्यात आले आहे. सोनूसिंग उमाशंकर सिंग (33, रा.राजगड, संध्या हॉस्पिटल, ता.माडियन, जि.मिर्झापूर, उत्तर प्रदेश) व विष्णूसिंग उर्फ विशालसिंग प्रमोद सिंग (33, रा.सईद नगर, आग्रा, उत्तर प्रदेश, ह.मु.ग्रँड स्कायर सोसायटी, आनंदनगर, घोडबंदर रोड, ठाणे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींचा पोलिस कोठडीचा हक्क राखून ओळख परेडसाठी न्यायालयीन कोठडी घेण्यात आली आहे.

भुसावळातही चोरी केल्याचा संशय
यावलचे तक्रारदार रीयाज खान शब्बीर खान हे भुसावळातील अयान कॉलनीत 12 रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास आल्यानंतर त्यांनी त्यांच्या बलेनो कार (क्रमांक एम.एच.19 सी.यु.4987) च्या मागील सीटावर पिशवीत तब्बल 13 लाख 50 हजारांची रोकड ठेवल्याची संधी साधून काळ्या रंगाच्या पल्सरवर आलेल्या दोघा संशयीतांनी गाडीच्या काचा फोडून रक्कम लांबवली होती. संशयीत आरोपींना औरंगाबाद पोलिसांनी अशाच पद्धत्तीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतल्याची माहिती मिळाल्यानंतर भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी भुसावळातील गुन्ह्यात आरोपींना ताब्यात घेतले आहे. तपास पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक देविदास पवार व सहकारी करीत आहेत.


कॉपी करू नका.