वरणगाव शहर झाले हगणदरीमुक्त


वरणगाव :  स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या व महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार भारतातील सर्व शहरातील सार्वजनिक शौचालयांची पाहणी केंद्र सरकारच्या त्रयस्थ संस्थेमार्फत करण्यात येऊन त्यानुसार ओडी फ्रीचा दर्जा देण्यात आला. वरणगावातही या संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी 2 ते 3 ऑगस्ट दरम्यान वरणगाव शहरातीलआठ सार्वजनिक शौचालयांसह दोन शाळांमधील शौचालयांची पाहणी केली. पाच सार्वजनिक शौचालयांना अति उत्कृष्ट असा दर्जा मिळाला तर दोन शौचालयांना अत्यंत चांगला असा रीमार्क देवून वरणगाव शहर हगणदरीमुक्त झाल्याचे जाहीर करण्यात आले. स्वच्छ सर्व्हेक्षण लीग 2020 मध्ये असा दर्जा मिळवणारी वरणगाव नगरपरिषद ही जळगाव जिल्यातील पहिली नगरपरीषद असल्याचे नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सांगितले.

वरणगावला मिळाला ओडीएफ प्लसचा दर्जा
वरणगाव शहराला ओडीएफ प्लसचा दर्जा केंद्र सरकार व राज्य सरकाराने दिला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीश महाजन, प्रधान सचिव नगरविकास मनीषा म्हस्कर, जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकने यांचे जाहीर आभार नगराध्यक्ष सुनील काळे, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी, विद्यमान मुख्यधिकारी शामकुमार गोसावी, पाणीपुरवठा अभियंता गणेश चाटे, बांधकाम अभियंता भैय्यासाहेब पाटील, नगरसेविका माला मेढे, नसरीन बी.साजीद कुरेशी, मेहनाजबी पिंजारी, शशी कोलते, प्रतिभा चौधरी, राजेंद्र चौधरी, नितीन माळी, गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, विष्णू खोले, अरुणा इंगळे, जागृती बढे सा, रोहिणी जावळे, वैशाली देशमुख, गणेश धनगर, विकिन भंगाळे व सर्व आरोग्य विभागातील कर्मचारी, कार्यालयीन कर्मचार्‍यांनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.